ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालकाच्या शर्टात निघाला साप.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालकाच्या शर्टात निघाला साप. 


एस.के.24 तास


चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालकाच्या शर्टात साप निघाला.सुदैवाने तो बिनविशारी साप असल्याने जिप्सी चालकाचा जीव वाचला.अन्यथा अनर्थ झाला असता.ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सोमवार १ जुलै पासून पावसाळी सुटी लागत आहे.पावसाळ्यात ताडोबा कोर झोन मधील पर्यंटन पूर्णपणे बंद असते. 


प्रकल्प तीन महिन्यांसाठी बंद होणार असल्याने शनिवार व रविवार असे दोन दिवस पर्यटकांची चांगलीच गर्दी ताडोबात होती. अशातच शनिवार २९ जून रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जिप्सी चालकाच्या शर्ट मध्ये निघाला साप निघाला. ताडोबाच्या कोलारा गेट परिसरातील ही घटना आहे.


जिप्सी चालक प्रमोद गायधने हे शनिवारी सकाळी सफारी साठी तयारी करत होते. तयारी करतांना शर्ट घातल्यावर त्यांना शर्टाच्या आत काहीतरी वळवळ जाणवली. त्यांना वाटले शर्टाच्या आत काहीतरी दोरी किंवा अन्य काही फसले असावे. मात्र त्यांनी बघितले असता तिथे मोठा साप त्यांना दिसला. साप दिवसात गायधने यांची बोबडी वळली. 


त्यांनी कशीतरी हिम्मत केली व सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र साप काही केल्या बाहेर निघत नव्हता. त्याच वेळी सुदैवाने तिथे स्वर्णा चक्रवर्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांचे तज्ञ जवळच उभे होते. यावेळी त्यांना बोलाविण्यात आले. त्यांनी बघितले असता साप होता. त्यांनी साप काढण्याच्या काठीने अगदी अलगद सापाला शर्टाच्या बाहेर काढले, शर्टात असलेला साप मांजऱ्या हा बिनविषारी साप असल्याचं झालं स्पष्ट झाले. हा साप बिनविशारी असला तरी सापाला बघून गायधने यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्यांची बोबडी वळली होती.


सापाला नंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिवंत सोडून देण्यात आले. ताडोबा प्रकल्पात सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येत आहे. तसेच विविध प्रजातीचे साप देखील आहे. विषारी व बिनविषारी असे दोन्ही साप या प्रकल्पात आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना वाघ, बिबट्यांसह अनेक सरपटणारे प्राणी दिसतात. ताडोबाच्या तलावात देखील मोठ्या संख्येने मगरी आहेत. 


त्याचेही दर्शन पर्यटकांना होत असते. ताडोबा प्रकल्प् आता तीन महिन्यांसाठी बंद राहणार असला तरी ताडोबात येणाऱ्या पर्यटकांनी वाघ, बिबट्या सोबतच सापांपासून देखील स्वत:चे रक्षण करावे. ताडोबा प्रकल्प ३० सप्टेंबर पर्यत बंद राहणार आहे. १ ऑक्टोंबर रोजी पर्यटकांच्या सेवेत हा प्रकल्प सुरू करण्यात येईल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !