आरमोरी पोलीसांनी १० लाख रुपये किंमती ची बिअर व देशी दारू पकडली ड्रायव्हर फरार.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
आरमोरी : जिल्हा पोलीस अधिक्षक,निलोत्पल गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार,रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १० लाखाची बिअर च्या पेट्या दोन चारचाकी गाड्या पकडण्यात यश आले.
परंतु स्कार्पिओ आणि स्पोर्ट चे ड्रायव्हर गाडी ठेवून पसार झाले. त्यामुळे पोलीसांना,ड्रायव्हर व बिअर विक्रेत्यांना पकडण्यात यश आले नाही.दि.२४ जुन ला पाहाटेच्या सुमारास आरमोरी पोलीस गस्तीवर असताना गडचिरोली - आरमोरी गाढवी नदिजवळ सापडा रचून बिअर च्या बॉटला भरून असलेल्या पेट्या व कारपिओ गाडी क्र. MH 31 EA - 9884 गाडी मुद्देमालासहीत पकडयात आरमोरी पोलीसांना यश आले परंतु गाडीचा ड्रायव्हर व बिअर नेवून विकणारा मालक फरार झाल्यामुळे सापडले नाही.
ठाणेदारांनी माहिती दिली असता दोन्ही गाड्या वेगवेगळ्या रात्रौ गुप्त माहितीच्या आधारे पकडण्यात आले. MH 12 C 3034 गाडी मधे जास्त बिअरच्या पेट्या आहेत एकारीत दोन गाड्या व दारू सहीत १५ लाखांचा मुद्देमाल पकडला असुन चौकशी सुरु आहे. संध्या ६५ ई / ९८ क, ८3 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कामगिरीत ठाणेदार राहागडाले , विजय चलाख , पोलिस रजनीकांत पिल्लेवान ' मनोज जंगमवार , सुरेश तागंडे आदि पोलीस स्टॉफ आरमोरी पकडतांना हजर होते.