मॅजिक बस संस्थेच्या वतीने भेंडाळा येथे जागतिक पर्यावरण दिन संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने भेंडाळा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, प्रश्नमंजुषा स्पर्धा, भाषाण स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा इत्यादी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले.
सोबतच परिसर स्वच्छता, पर्यावरण मार्गदर्शन इत्यादी गोष्टीची आयोजन करण्यात आले होते. विजय व सहभाग स्पर्धकास शैक्षणिक वस्तू बक्षीस देण्यात आले हा कार्यक्रम मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, तालुका समन्वयक योगिता सातपुते व दिनेश कामतवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला . या कार्यक्रमाला ग्रामसेवक कुंभारे मॅडम, अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार,गावातील स्वयंसेवक तेजस्विवी तुबडे, युथ सानिका भुरसे, सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून संपन्न झाला.