कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक,भीषण अपघातात दोघांचा मृत्यू ★ मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी,रायपुर येथील रहिवासी

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक,भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

★ मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी,रायपुर येथील रहिवासी


एस.के.24 तास


कोरपना : कोरपना - गडचांदुर मार्गावर बुधवार 5 जून रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी,रायपुर येथील रहिवासी होते.समीर मडावी व प्रियांका झित्रु कुलसंगे असे मृतकाचे नाव आहे.हा अपघात हा सोनूर्ली गावाजवळ घडला.समीर व प्रियंका गडचांदूर येथे बँकेत काही कामानिमित्त आले होते.


दोघे दुचाकीने परतीच्या वाटेवर असताना कोरपना-गडचांदूर मार्गावरील सोनूर्ली गावाजवळ समोरून कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्र.MH.34 AB.1173 याने समोरून समीर च्या दुचाकीला धडक देत तब्बल 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले.अपघात इतका भीषण होता की दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. 


अपघातस्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे, रस्ता खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने नियंत्रित गतीमध्ये वाहन चालवितात.मात्र कोळसा वाहतूक करणारे ट्रक चालक हे बेभान होत वाहन चालवितात.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !