अ-हेरनवरगाव येथील सिमेंट काँक्रीटने तयार करण्यात येत असलेला रस्ता ओबड - धोबड व निकृष्ट दर्जाचा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगाव दिनांक,०२/०६/२४ अ-हेरनवरगाव येथे गावातील ब्रह्मपुरी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचेआमदार निधी मधून बांधण्यात येत असलेला सिमेंट काँक्रीट चा रस्ता हा ओबड धोबड, कुठे खोलगट,उंच, आणि चढ - उतार या पद्धतीचा बांधण्यात येत आहे.
फुटलेल्या अवस्थेत काँक्रीट रोड
संबंधित रस्ता बांधकाम करीत असताना वापरण्यात येत असलेली लोखंडी सलाख रस्ता बांधकामात वापरली हे भासविण्यासाठी ती बारीक असून अंदाजे ६ किंवा ८ एम एम ची वापरण्यात येत आहे.सदर रस्ता बांधकाम सुरू असतानाच रस्त्याला जागोजागी भेगा पडलेल्या आहेत.पुढे पाठ आणि मागे सपाट अशी या रस्त्याची बांधकाम करण्याची पद्धत सुरू आहे.बांधकाम करीत असतांना बांधकामात असलेल्या दोषाची गावकरी वारंवार सूचना संबंधित बांधकाम करणाऱ्या ठेकेदार ला करून ही संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे.
बांधकाम करीत असतांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शासकीय नेमलेल्या कर्मचाऱ्याची उपस्थिती असणे अनिवार्य असून सुद्धा तिथे शासकीय अधिकारी, अथवा कर्मचारी उपस्थित राहत नाही आणि आठवड्यातून एखाद्या वेळेस उपस्थित राहत असेल तर त्या कर्मचारी, अधिकाऱ्याला संबंधित बांधकामातील दोष का दिसत नाही ? हा एक प्रश्न जनतेच्या डोळ्यापुढे उभा आहे.
जेथे रस्त्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे त्या ठिकाणी पाणी मारण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे रस्त्यावरील धूळाचा जाणाऱ्या येणाऱ्या आणि घराजवळील लोकांना त्रास सहन करावा लागतो प्रसंगी या धुरामुळे फुफ्फुसाचे आजार होण्याची दाट शक्यता आहे.रस्ता बांधकाम सुरू असताना वाहनधारकांना त्यांच्या सोयीसाठी कुठेही सूचनाफलक न लावल्यामुळे प्रवाशांना दोन चाकी, चार चाकी वाहनधारकांना वाहन पलटवतांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे संबंधित ठेकेदाराने करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. संबंधित ठेकेदाराने बांधकाम केलेल्या रस्त्याला पडलेल्या भेगा दुरुस्त केल्या नाही आणि ज्या ठिकाणी समान पातळीत रस्ता नसुन कलवट ऊताराचा तो दुरुस्त करावा अशी गावक-यांची मागणी आहे.
जर ठेकेदाराने रस्ता बांधकामातिल दोष दुरुस्त केले नाही तर शासनाने संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करावी आणि बिलाची रक्कम देऊ नये अशी गावकऱ्यांची रास्त मागणी आहे.त्या साठी शासनास चौकशी साठी निवेदन देण्यात येईल.