पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे का फक्त भाजप चे ?
★ पालकमंत्री फडणवीस जिल्हा दौऱ्यावर मात्र सर्वसामान्य नागरिकांचे गाऱ्हाने ऐकायला त्यांना वेळ नाही.
◆ निष्क्रिय पालकमंत्र्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. - महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी
एस.के.24 तास
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्याचा विकास होईल जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील असे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पोरके केले आहे. असा आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले आणि प्रशासनाची गुप्त बैठक घेऊन निघून गेले, मात्र या संदर्भात पालकमंत्री जिल्हा दौरा करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक समस्या प्रलंबित आहे. शेतीला नियमित वीज पुरवठा होत नाही, पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटतो.
जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा वाजले आहेत,जिल्हा रुगनालयात अत्यावशक सोयी उपलब्ध नाही त्यामुळे अनेक रुग्णांना नागपूर किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते, पोलीस भरतीच्या युवकांचे प्रश्न आहेत, 2वर्षे झाले भाजप सरकार सत्तेत आले मात्र अद्याप ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यात आलेले नाही.
शेतकरी, महिला, युवक यांच्या समस्यांना घेऊन जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटायचे होते व आपले म्हणणे मांडायचे होते.मात्र पालकमंत्री सुरक्षेचा कारन दाखवून दौरा गुप्त ठेवल्याचे सांगतात.पार्टी च्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरीता पालकमंत्र्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहत नाही मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटल्यामुळे पालक मंत्र्यांना आपल्या जिवाला दोखा वाटतं असेल तर खुशाल त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व सक्रिय असा पालकमंत्री जिल्ह्याला द्यावा जेणे करून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकारन होऊन शकेल अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.