सावली तालुक्यातील दलितांच्या मतापेक्षा कांग्रेसची मते कमी मिळाल्यामुळे वडेट्टिवारांची नाराजी.
★ व्याहाड खुर्द येथे विरोधी पक्षनेते, विजयभाऊ वडेट्टिवाराच्या उपस्थितीत कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
सावली : नुकतेच देशात लोकसभा निवडणूक २०२४ पार पडले यात काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीला लोकांकडून जोरदार समर्थन बघावयास मिळाले,त्यातच गडचिरोली - चिमूर लोकसभा इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान हे आपले प्रतिस्पर्धी अशोक नेते यांच्यापेक्षा १ लक्ष ४०००० मताने खासदारपदी निवडून आले.
याकरिता विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी संपूर्ण लोकसभेची जबाबदारी घेतली होती व त्यात यांना यश मिळाले. तालुका काँग्रेस कमिटी सावली तर्फे मौजा.व्याहाड खुर्द येथे कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
असता विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी भेट दिली व समस्त पदाधिकारी व कार्यकर्तागणं यांना ठणकावून सांगीतले की,सावली तालुक्यात दलितांच्या मतापेक्षा कांग्रेस पक्षाची मते कमी पडली.किसाननगर येथे २०० मते कमी पडली.
जांब केरोडा परिसरात वंचित ला जाणारी मते यावेळी कांग्रेसला जास्त आहेत.दिनेश पा. चिटमुलवार यांना धन्यवाद दिला.गानली लोकांच्या गावात मतदान कमी पडले.ठेके आम्ही घ्याचचे ' सहकार्य करायचे आणि तुम्ही मात्र माझ्यासाठी काम न करता पैशासाठी काम करायचे अशी निती बदलवा नाही तर माझा ही बट्याबोळ कराल अश्या शब्दात कांग्रेस कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले.सर्वाचे आभार मानत पूढील निवडणूकीत यापेक्षाही अधिक मेहनत करावी व काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी प्रदान करावी असे सांगीतले.
प्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटणुरवार,तालुका अध्यक्ष नितिन गोहने,महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिवराज पाटील शेरकी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव बंडू पाटील बोरकुटे,शहर अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे
माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार,युवा तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,युवा विधानसभा उपाध्यक्ष मा.नितीन दुवावार,कृषी उत्पन बाजार समिती संचालक मा.निखिल सुरमवार, जेष्ठ काँग्रेस महिला पदाधिकारी सौ.उर्मिला तरारे,सौ.रुपाली कन्नाके, महिला शहर अध्यक्ष सौ.भारती चौधरी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ता गण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र रिपाई कार्यकर्त्यांना बोलाविले नव्हते. याचाच अर्थ मते मिळाली निवडणुक संपली.
कार्यकर्ता आढावा सभेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याचे अभिनंदन करताना विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी "सावली तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास ५००० पर्यंत लीड मिळवून दिली, दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्तागणं यांची विशेष भूमिका आहे.
ज्या काही बूथावर आपण मागे पडलो आहो त्याकडे अधिक लक्ष्य देऊन पुन्हा जोमाने काम करावे भविष्यात होणाऱ्या विधानसभा,विधान परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकात काँग्रेस पक्षाला नंबर एक वर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे" असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केली आहे.
कार्यकर्ता आढावा बैठकीला सावली तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रुपेश किरमे,प्रस्तावना तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने,तर आभार जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्राम काँग्रेस कमिटी व्याहाड खुर्द येथील समस्त पदाधिकारी व कार्यकर्तागणं यांचे विशेष सहकार्य लाभले.