मोदी ३.० म्हणजे विकसित भारताच्या तिसऱ्या पर्वाची सुरवात. - प्रा.अतुल देशकर
★ ब्रह्मपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोदी सरकारच्या शपथविधीचा भाजपा तर्फे जल्लोष.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,९/६/ २४ लोकसभा निवडणुकीत इतिहास रचल्यानंतर सलग तिसऱ्यांदा विश्वगौरव, देशाचे लोकप्रिय नेतृत्व मा. नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली.मोदी सरकारच्या या शपथविधी सोहळ्याचा जल्लोष भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी च्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्या व कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू व मिठाई वाटत हा आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी मोठी एलईडी स्क्रीन लावून मोदी सरकारच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण जनतेसाठी आयोजित करण्यात आले होते.
नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विश्वगौरव नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. मोदी 3.0 म्हणजे विकसित भारताच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात आहे असे प्रतिपादन भाजपा नेते, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी केले.
पुढे बोलतांना गडचिरोली लोकसभेत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता येणाऱ्या विधानसभेत नेत्र दीपक यश प्राप्त करण्यासाठी उत्साहाने व शक्तीने कामाला लागण्याचे आवाहन भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांना केले. या वेळी मोदी सरकारच्या स्थापनेच्या शुभेच्छा माजी आमदार अतुल देशकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व जनतेला दिल्या.
या जल्लोष कार्यक्रमाला भाजपा ब्रह्मपुरी विधानसभेचे विस्तारक प्रा. कादर शेख, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदना शेंडे, महायुतीचे विनोद नवघडे, महायुतीचे प्रा.संतोष रामटेके, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. अरुण शेंडे, शहराध्यक्ष इंजि. अरविंद नंदूरकर, माजी पं. स सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, माजी नगरसेवक तथा तालुका महामंत्री मनोज वठे, जिल्हा उपाध्यक्षा रश्मी खानोरकर पेशने,जिल्हा
सचिव साकेत भानारकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तनय देशकर, शहराध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत आंबोरकर, जेष्ठ नेते डॉ. गोकुल बालपांडे, शहर महामंत्री विक्रम कावळे, ओबीसी आघाडीचे शहर अध्यक्ष डॉ. अशोक सालोटकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. वर्षा चौधरी, माजी जि.प सदस्य शंकरदादा सातपुते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लीलाराम राऊत, माजी पं.स सदस्य प्रकाश ननावरे, शहर उपाध्यक्ष पवन जयस्वाल, रितेश दशमवार, उत्तम उरकुडे, युवा मोर्चा शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें, पंकज माकोडे, अमित रोकडे,
माजी नगरसेविका पुष्पा गराडे, डॉ.हेमलता नंदूरकर, संजय बावनकुळे, सरपंच अनिल तिजारे, सरपंच उमेश घुले, चोरटी सोसायटीचे अध्यक्ष अनंत बनपूरकर, जेष्ठ कार्यकर्त्या नलिनी बगमारे, भाजपा ओबीसी मोर्चाचे शहर महामंत्री राजू भागवत, प्रा. जुमडे, सुभाष नाकतोडे, विनायक दुपारें, प्रकाश करंबे यांच्या मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.