कुर्झा - बोंडेगाव सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी,चंद्रकांत बावनकुळे.

कुर्झा - बोंडेगाव सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी,चंद्रकांत बावनकुळे.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी :  तालुक्यातील कुर्झा - बोंडेगाव येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गोपीचंदजी देवाजी उराडे यांच्या आकस्मिक निधनामुळे सेवा सहकारी संस्थेची जागा रिक्त झाली. या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी कुर्झा येथील चंद्रकांत (कांतू) ज्ञानेश्वर बावनकुळे यांची सेवा सहकारी संस्थेच्या सभेमध्ये अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली.

     

यावेळी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप ठेंगरी, सचिव मनोज गायधनी,संचालक शरद उराडे,रविंद्र उराडे,रमेश विखार, मुखरु बावनकुळे, तुळशीदास करंबे, प्रशांत मेश्राम,शामराव शिऊरकर,कालीचरण बगमारे, मंगला फटींग,मंदाबाई करंबे यांनी नूतन अध्यक्षाचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !