ब्रेकिंग न्युज ...
चामोर्शी तालुक्यातील रा.गोवर्धन (कुणघाडा रै) वीज कोसळून दोघांचा मृत्यू ; दोन जखमी
एस.के.24 तास
चामोर्शी : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे.चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा रै व तळोधी मोकासा परिसरात आज सायंकाळी अचानक चक्रीवादळ व विजांच्या कडकटासह गारपीट झाली.
वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.सदर घटना आज 6 जून रोजी सायंकाळी 5.20 वा.च्या सुमारास घडली.
गुरूदास मणिराम गेडाम वय,42 वर्ष रा.गोवर्धन (कुणघाडा रै) याचा वीज कोसळून मृत्यू झाला.
तर गंभीर जखमी वैभव चौधरी यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमी मध्ये नीलकंठ तरकडू भोयर,लेकाजी नैताम रा.तळोधी मोकसा यांचा समावेस आहे.
कुणघाडा रै. परिसरातील कुणघाडा,तळोधी (मोकासा) परिसरात अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे राईस मिल सह घरांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. यावेळी गारपीट व वादळी पाऊस झाला.त्यामुळे राईस मिल व अनेकांच्या घरावरील टिन पत्री उडाली आहेत. काहींच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे परिसरातील जीवनमान काही काळ विस्कळीत झाले आहे.