सावली तालुक्यातील सामदा घाट जवळील डोंगरी परिसरात अवैध रेतीची तस्करी
★ धडक कारवाईत ६० ब्रास रेती साठा जप्त.
एस.के.24 तास
सावली : मत मोजणीच्या कामात महसूल विभागाचे अधिकारी गुंतले असताना रेती तस्करांनी सावली तालुक्यातील सामदा घाट जवळील डोंगरी परिसरात अवैधरित्या रेतीची साठवणूक केली होती.या बाबतची माहिती,तहसीलदार प्रांजली चिरडे यांना मिळताच शुक्रवारी त्यांनी धडक कारवाई करत ६० ब्रास रेतीसाठा जप्त केला.या कारवाईने रेती तस्कारांचे धाबे दणाणले आहेत.
सावली तालुक्यातील रेती सर्वत्र प्रसिद्ध आहे.त्यामुळे या रेतीची मागणी अधिक असते.परंतु, रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने अनेक रेती तस्कर सक्रीय झाले आहे.दरम्यानच्या काळात तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी रेती तस्कारवर कारवाई केल्याने रेती तस्करीवर काही प्रमाणात अंकूश लागले होते.
दरम्यान निवडणुकी च्या कामात महसूल विभाग गुंतला असल्याचे लक्षात घेऊन रेती तस्करांनी पुन्हा डोके वर काढले होते.
सामदा रेतीघाटाजवळील डोंगरीपरिसरात अवैधरित्या रेतीसाठ असल्याची माहिती मिळताच तहसीलदार चिरडे यांनी आपल्या पथकासह संपूर्ण रेतीसाठा जप्त केला आहे. या कारवाईने अवैधरित्या रेतीसाठा करुन ठेवणाऱ्या तस्कराचे धाबे दणाणले आहेत.ही कारवाई तहसीलदार प्रांजली चिरडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी निखाते,कुळमेथे,तलाठी कुडावले,मंगाम, निशानकर, वाघमारे यांनी केली.