ॲट्रॉसिटी ॲक्ट लावण्यास गडचिरोली ठाणेदाराची टाळाटाळ.

ॲट्रॉसिटी ॲक्ट लावण्यास गडचिरोली ठाणेदाराची टाळाटाळ. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर


गडचिरोली : विहीरगांव येथील एका दलित महिलेवर झगडा - भांडणं जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या एका सर्वणाच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊनही ठाणेदार गैरअर्जदाराना अभय देत असल्याचे कळते. दि. २० जुन रोजी अश्रुधारा कपिल निमगडे रा. विहीरगाव येथील महिला सोबत एका सवर्णांनी कडाक्याचे भांडण करून जातीवाचक शिविगाळ करून तिच्या बांगड्या सुद्धा फोडल्या त्यावरून अश्रुधारा कपिल निमगडे हिने पोलीस स्टेशन गडचिरोली , sDpO गडचिरोली एस. पी साहेब गडचिरोली यांच्याकडे तक्रार देण्यात आली.


 SDP0 गडचिरोली यांनी सदर गंभीर प्रकरणाच्या तक्रारीची दखल घ्यायला पाहिजे होती. परंतु गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार फेकडे यांनी कनिष्ठ दर्जाच्या हवालदाराकडे चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सबंधित पोलीसांनी थातूरमातूर चौकशी करून सर्वणच साक्षीदार पाहीजे म्हणुन सदर प्रकरणात गंभीर दखल घेतली नाही. आदिवासी गडचिरोली जिल्हयात अनू जाती - जमातीवर दिवशेनदिवस अत्याचार घडत असून अनू जाती जमातीच्या सरक्षणासाठी सरकारने १९८९ सालापासून ॲक्ट्रोसिटी कायदा अमलात आणला.


 प्रस्तुत कायद्याने 2018 पासून पुन्हा दुरस्ती करून अनू जाती जमाती प्रतिबंधक कायदा अधिक बळकट करण्याकरीता उच्च दर्जाचा SD p 0 ( उपविभागीय पोलीस अधिकारी )यांनी सदर घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून ४८ तासात गैर अर्जदारावर गुन्हा नोंद करावा अशी कायदयात तरतुदअसतांना सुद्धा एका पोलीस शिपायाकडे चौकशीचे आदेश देऊन त्यांनी थातुरमातूर चौकशी करून गैर अर्जदारास अभयच देण्याचे काम केले आहे. जिल्हयात अनूसचित जाती - जमातीवर अश्याच प्रकारचे अन्याय अत्याचार होत राहतील तर पोलीसाकडून कायद्याची पायमल्ली होत राहील.


 व अनू जातीवर अन्याय अत्याचार होतच राहतील तेव्हा SD po गडचिरोली यांनी सदर घटनेची योग्य चौकशी करून दोषीवर त्वरीत कारवाई करावी अन्यता रिपब्लिकन पार्टी तर्फे उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागेल अशी मागणी रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर रिपाई नेते गोपाल रायपूरे यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !