सुरेश ग्रंथपालच नव्हे तर अनेकांची सेवा आणि सहकार्य करणारा व्यक्ती. - डॉ.डि.एच.सिंगाडे
★ ग्रंथपाल सुरेश गजभिये शासकिय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
ब्रम्हपुरी : शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथील कर्मचारी ग्रंथपाल सुरेश गजभीये हा केवळ ग्रंथपालच नव्हता तर अनेक कामात जनतेला सहकार्य करणारा जनु काही राजकीय कार्यकर्ताच होता.असे गौरवउदगार माजी प्राचार्य डॉ.डि.एच.सिगांडे यांनी गजभिये यांच्या सत्कारा प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथील सत्कार समारंभ प्रसंगी काढले.
शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथील कर्मचारी गजभीयेचा यांचा सत्कार करण्यात आला यात कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य डॉ.सिगांडे हे होते अध्यक्ष स्थानी कॉलेज चे प्राचार्य राजन वानखडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य,साखडकर,माजी प्राचार्य कुकडकर,डॉ.पावडे सर, डॉ.डायगव्हाणे सर आदि लाभले होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ.राजन वानखडे म्हणाले की गजभिये वाल्याचा वाल्मीक होवून आज आपला संसार चांगल्या प्रकारे थाटला आहे. त्याचे अनेकांसी संबंध व सहकार्य पाहुण आज मुंबई ते गडचिरोली जिल्हयातील आजी - माजी प्राचार्य व प्राध्यापक त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आलेत हि साधी बाब नाही.
या प्रसंगी डॉ.साखडकर,माजी प्राचार्य, कुकडपवार,डॉ. पावडे सर,प्रा.डायगव्हाणे,परदेशी सर,सरोदे सर,वि.प्रमुख केतकर सर,आदिनी गजभीयेचे यांच्या कारकिर्दीची माहिती सांगीतली.सत्कार मुर्ती सुरेश गजभिये म्हणाले की.मी ज्यांच्या संपर्कात आलो ते माझ्यासाठी सहकार्याची भावना ठेवली त्यांच्या मुळेच माझी प्रगती झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.आय.एस. सांगोळे यांनी केले.
कार्यक्रमास परदेशी सर नंदुरबार,केतकर सर,गाडगे सर , चौके सर.प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली,यशोधर सुरेश गजभिये,नवेश सय्यद,निलीमा सय्यद,विभाग प्रमुख जानराव केसकर,प्रा.मिनाक्षी मानलवार,प्रा.शालीनी खरकाटे,प्रा.माधुरी नागदेवते,आदि सहीत बहुसंख प्राध्यापक व गजभीये यांच्या चाहते उपस्थित होते.