" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेसह माता भगिनींसाठी योजनांचा नजराना. - प्रा.अतुल देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी


" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेसह माता भगिनींसाठी योजनांचा नजराना. - प्रा.अतुल देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी


अमरदीप लोखंडे, सहसंपादक.


ब्रम्हपूरी : दिनांक,२९/०६/२४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री मा.ना.अजित पवार यांनी सहा लाख बारा हजार दोनशे तीन कोटी रुपयांचा अतिरिक्त अर्थसंकल्पना संकल्प विधानसभेत मंजूर केला.या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, वारकरी,युवक यांच्यासह समाजातील सर्वच घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर योजनांची घोषणा केली आहे.


यामध्ये 1)माता भगिनींसाठी 21 ते 60  वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" 2) 17 शहरांमधल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य.3)वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. 4)लखपती दीदी योजनेअंतर्गत सात लाख नवीन बचत गटांची स्थापना करणे तसेच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरून तीस हजार रुपयांची वाढ. 5) महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना लघु उद्योजक महिलांना पंधरा लाख रुपये कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना.


राज्यातील महिलांच्या सर्वंकष विकासासाठी आर्थिक स्वावलंबन करणे,सामाजिक सांस्कृतिक स्तर उंचावणे,आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबात आर्थिक सहभाग वाढविणे पर्यायाने कौटुंबिक दर्जा वाढविणे,शासनाच्या या उदात्त प्रयत्नांचे  मी स्वागत करतो,अभिनंदन करतो. मात्र शासनाच्या या योजना तळागाळातील माता भगिनींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कार्यकर्त्याने निष्ठेने पार पाडावे.असे आवाहन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !