नाट्यश्री कविता स्पर्धेतील तेविसाव्या सत्रात सौ.संगीता संतोष ठलाल विजयी.

नाट्यश्री कविता स्पर्धेतील तेविसाव्या सत्रात सौ.संगीता संतोष ठलाल विजयी.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  " आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  


या कवितेला " आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी " म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 


या उपक्रमाचे तेविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात 24 कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री सौ.संगीता संतोष ठलाल यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या " भृणहत्या " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 


सौ.संगीता संतोष ठलाल या मौजा,कुरखेडा (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवयित्री, समिक्षक, स्फूट लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तीन हजार च्या जवळपास कविता व इतर साहित्याचे लेखन त्यांनी केलेले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता, लेख , समिक्षणे प्रकाशित झालेली आहेत.


व्हॉट्सॲप गृपवरुन सुरू असलेले त्यांचे  विचारधारा हे सदर विशेष लोकप्रिय असून जवळपास १०००चा टप्पा या सदराने पार केलेला आहे. त्यांना अनेक ऑनलाईन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 

        

त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे  तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

        

या तेविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रेमिला अलोने, वंदना सोरते,अजय राऊत, माधुरी अमृतकार, मधुकर दुफारे,  सुनील मंगर, नरेंद्र गुंडेली, तुळशीराम उंदीरवाडे, पुनाजी कोटरंगे, सुरज गोरंतवार, गणेश रामदास निकम, प्रभाकर दुर्गे, विलास जेगठे,संगीता ठलाल,सुजाता अवचट,पी.डी.काटकर,मुरलीधर खोटेले, संतोष कपाले,पुरुषोत्तम दहिकर,खुशाल म्हशाखेत्री, रेखा दिक्षित, डॉ. मंदा पडवेकर, ज्योत्स्ना बंसोड, व जयराम धोंगडे  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.


या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !