विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील चांदली बुज येथे सांत्वनपर भेट.
★ माजी उपसभापती स्व.मंगलाताई चिमड्यालवार यांच्या दुःखद निधनाने काँग्रेसने आपला सच्चा कार्यकर्ता गमावला. - विजय वडेट्टीवार
एस.के.24 तास
सावली : दिनांक,१० जुन २०२४ तालुक्यातील चांदली बुज येथे राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी १० जुन २०२४ ला चांदली बुज येथील माजी पंचायत समिती उपसभापती व जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी स्व.मंगला बंडू चिमड्यालवार वय ५८ वर्षे यांचे ९ एप्रिल २०२४ ला हृदयवीकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.
विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चिमड्यालवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. स्व.मंगलाताई चिमड्यालवार ह्या शांत व संयमी जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी होत्या सावली तालुका काँग्रेस कमीटीच्या सर्व उपक्रमात त्या हिरहिरीने भाग घेत होत्या.त्यानी आपल्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाचे अनेक महत्वाची पदे भूषवली होती,त्या पंचायत समिती सावलीच्या माजी उपसभापती होत्या.
त्यांच्या दुःखद निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुस्कान झाले ती पोकळी भरून काढणे कठीण आहे, घरातील जेष्ठ व्यक्ती गेल्याने चिमड्यालवार कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.या कठीण प्रसंगी आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार व काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्ते यांनी चिमड्यालवार कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत मा.बंडू सावकर चिमड्यालवार व कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष मा.नितीन गोहने,माजी सभापती पंचायत समिती सावली मा.विजय कोरेवार,माजी सरपंच मा.गजानन गुरुनुले,ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.विकास पुप्परेड्डीवार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मा.विलास येनगंटीवार,सौ.शिलाताई गुरुनुले तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.