कै.बाबुराव मडावी यांच्या स्मृतिदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १६ जुन ला.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयाचे शिल्पकार तथा आदिवासी समाजाचे हदयसम्राट माजी राज्यमंत्री कै. बाबुराव मडावी यांच्या स्मृतिदिनी गुणवंत विद्यार्थांचा भव्य सत्कार सोहळा दि. १६ जुन २०१४ सायंकाळी ५ वाजता सुप्रभात मंगल कार्यालय आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे तर मुख्य अतिथी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार असुन सत्कारमूर्ती नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवराव किरसान व सुमित्राताई बाबुराव मडावी नागपूर हे आहेत.
तसेच प्रमुख अतिथी म्हणुन कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे,आदिवासी नेते घनश्याम मडावी ,शिक्षण महर्षी अनिल पाटिल म्हशाखेत्री, रोहिदास राऊत आदि लाभणार आहेत.तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै.बाबुराव मडावी स्मारक समितीने केलेले आहे.