प्रिपेड मिटर विरोधात एल्गार रूपेश पाटील यांचे नेतृत्वात निवेदन सादर.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : महाराष्ट्र राज्यात शेतकरी,कामगार,दलित, आदिवासी बहूल व बहुसंख्य सर्वसामान्य जनतेचा निवास आहे.विदयुत बिलाचे आर्थिक झटके कसेबसे सहन करणाऱ्या महाराष्ट्र वासियांवर " प्रिपेड मिटर " बसवून अधिक त्रासदायक होईल असे धोरण राबविणे अनाठायी ठरणार आहे.
या विरोधात सामाजिक कार्यकर्ते,रुपेश पाटील मारकवार यांचे नेतृत्वात तहसिलदार मुल यांना निवेदन सादर करण्यात आला.महाराष्ट्रातील उपलब्ध साधन संपत्तीवर मोठया प्रमाणात विदयुत निर्मिती होऊन इतरत्रही पुरवठा होतो.अनेक राज्यांनी २०० युनिट पर्यंत विदयुत बिल माफ करण्याचे धोरण सुरू केले आहे.
तर महाराष्ट्रात विज बिलाचे दर इतर राज्यांचे तुलनेत सामान्य जनतेला पेलवेनासे झाले आहे.महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.आधीच न पेलणाऱ्या विज बिलाला धरून असंतोष सुरू असताना " प़िपेड मिटर " लावण्याचे धोरण आर्थिक संकटात टाकणारे ठरणार आहे. व ही गंभीर बाब शासन,प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष निर्माण करणारी ठरणार आहे.
विदयुत बिल भरण्याची प्रचलित प्रणाली डोईजड होत आहे.प्रिपेड मीटर लावल्यास महाराष्ट्रातील जनतेवर मोठा अन्याय होणार आहे.सदर धोरण त्वरीत थांबवून सदर अन्याय थांबवावा व ही बाब गंभीरतेने घेऊन शेतकरी,कामगार,दलित, आदिवासीबहूल महाराष्ट्र वासियांना दिलासा देण्यात यावा.अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा दम निवेदनाद्वारे भरण्यात आला आहे.
यावेळी तालुक्यातील शेतकरी,मजूर,व्यावसायीक मोठया संख्येने रुपेश मारकवार यांचे नेतृत्वात तहसिल कार्यालयावर धडकले होते.
यावेळी प्रवीण जी वालदे,मोहन शांतलवार,किशोर मेश्राम शेंडे सर,मुल विजुभाऊ भोयर दत्तू भाऊ समर्थ विरई येथील ग्राम पंचायत सदस्य,अतुल गोवर्धन इतर वीस पंचवीस कार्यकर्ते हजर होते.