नियमित योगसाधना करुन आरोग्य स्वस्थ ठेवावे आंतरराष्ट्रीय योगदिवस. - अशोक भैया
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२१/०६/२४ आजचे जग हे धावपळीचे असून प्रत्येक व्यक्ती अनेक कार्यात सतत व्यस्त असतो. कामामुळे त्याला त्याच्या प्रकृतीकडे पाहिजे तेवढे लक्ष देता येत नाही, म्हणून प्रत्येक व्यक्तीने योगसाधना करुन आपले आरोग्य स्वस्थ ठेवावे " असे बहुमोल मार्गदर्शन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयांनी केले.ते आंतरराष्ट्रीय योगदिवसानिमित्त उद् घाटक म्हणून बोलत होते.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे होते तर उपस्थितीत उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, डॉ तरल नागमोती, प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ देविदास जगनाडे, डॉ लक्ष्मीकांत लाडुकर,पंढरीजी खानोरकर,प्रा विनोद नरड, कॅप्टन डॉ कुलजित शर्मा इ.मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ गहाणे म्हणाले की,मला आज व्यापारी वर्ग स्वस्थ दिसतो कारण तो योग करतो.पंतप्रधानांनी योगदिवसाचे महत्त्व जाणले,जगातिल देशांसमोर ठराव मांडला व अनेक देशाने ते मान्य केले.आज योग ही आपली गरज झाली आहे.असे मत मांडले.
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिवस पार पडला.याप्रसंगी एन सी सी विद्यार्थ्यांनी योगनृत्य करुन प्रात्यक्षिक केले.यानंतर डॉ तरल नागमोती,मेघा बांगरे,रश्मी राऊत व संच यांनी योगाचे धडे दिले.
संचालन भगवान कन्नाके तर आभार डॉ वट्टीने मानले.यशस्वीतेसाठी डॉ कुलजित शर्मा,प्रा रेवंतदास बोरकर, ब्रह्मपुरी योगसमितीने मोलाचे सहकार्य केले.