रितेश नागदेवते यांचा गजानन बाबा मंदिर पोर्ला जवळ अकस्मित मृत्यु

रितेश नागदेवते यांचा गजानन बाबा मंदिर पोर्ला जवळ अकस्मित मृत्यु


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : गडचिरोली वरून 13 कि.मी. अंतरावरील पोर्ला जवळ रामनगर गडचिरोली येथील एका व्यक्तीचा अकस्मित मृत्यु झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 


आज दि. 3 जुन ला दुपारी 4 : 00 वा. चे दरम्यान रितेश नागदेवते वय,40 वर्ष राहणार रामनगर हा पोर्ला ते मोहझरी रोड दरम्यान गजानन महाराज मंदिराजवळ अकस्मित मृत्यु झाला.रितेश हा गेल्या दोन दिवसा पासुन बेपत्ता होता असे त्यांच्या आईने सांगितले. 


ज्या वेळेस मृत्यु झाला होता.त्यावेळी बनियान चड्डीवर होता यावरून शंका कुशंका निर्माण होत आहे.तो गडचिरोली वरून पोर्ला जवळच का गेला असावा. अंगावर कोणत्याच प्रकारच्या जखमा नाहीत.उष्मघात तर नसावा की दारु पिऊन असावा अश्या अनेक शंका निर्माण होत आहे.


मृत्यूदेह शवविच्छेदन साठी जिल्हा सामान्य रुग्णालय  गडचिरोली येथे नेण्यात आले.

पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !