उद्या चंद्रपूरात राष्ट्रीय लोकहिताच्या वतीने दहावी- बारावी परीक्षेतील गुणवंतांचे कौतुक व अभिनंदन
किरण घाटे - चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर : राष्ट्रीय लोकहितच्या वतीने उद्या रविवारी दि.2 जून 2024 ला तुकूम येथे दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला लोकहितचे कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ, समाजसेविका ,अर्चना समर्थ,अधिवक्ता मेघा धोटे,सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, तुकुमच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या चंदा इटनकर, कविता कोंडावार,भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष कु.किरण साळवी,
नागपूरच्या डॉ.स्मिता मेहेत्रे, प्रियंका गायकवाड, कवयित्री वैजयंती गहुकर , रिना तेलंग,चित्रकार रश्मि पचारे, कल्पना गिरटकर, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे, अधिवक्ता रवींद्र उमाठे,आयटकचे प्रकाश रेड्डी, अपर्णा चिडे ,नाशिकच्या समाजसेविका चैताली आत्राम आदिं मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.