चारगाव तलाव दुरुस्तीसाठी वडेट्टीवार सरसावले - स्वखर्चातून केली तलावाची दुरुस्ती.
एस.के.24 तास
सावली : चारगाव मामा तलावाला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहण्याची पाळी आली. मात्र ही बाब विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कळताच तलावाची दुरुस्ती स्वखर्चान करून दिली त्यामुळे शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांचे आभार मानले.
सावली तालुक्यातील चारगाव येथे मामा तलावाच्या गेटजवळून पाणी लिकेज होत होते.दरवर्षी हा लिकेज वाढत असतांना शेतकऱ्यांनी पोते मागील कसेबसे मागील वर्षी पिक काढले मात्र यावर्षी पाळ फुटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी ही बाब पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार,श्रीकांत बहिरवार यांना कळविले. त्यांनी याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कळविले. तोंडावर पावसाळा असल्याने व सरकारी यंत्रणेला काम मंजूर करण्यासाठी कालावधी लागत असल्याने शेतकऱ्यांची निकडीची गरज लक्षात घेता स्वखर्चातून खोदकाम, काँक्रिटीकरण काम करण्याचे सांगितले.
त्यानुसार पंचायत समितीचे माजी सभापती,विजय कोरेवार,काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीकांत बहिरवार, उपसरपंच राजू वलके, महादेव कुमरे, उल्हास डोंगरे, रवी डोंगरे आदिनी काम पूर्ण करून घेतले. यामुळे शेकडो एकर शेतीला सिंचन होऊन शेतकरी पिक घेऊ शकणार आहेत. त्यामुळे सजेतकऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.