शंभर टक्के निकाल देणारी शाळा अनेकांनी केले उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : सोमवार दि.२७ मे ला दहाव्या वर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यातील एस .एम .जी.विद्यामंदिर दातिवली दिवा शाळेतील १२२ विद्यार्थ्यांनी दहाव्या वर्गाची परीक्षा दिली होती.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या शाळेतील दहाव्या वर्गाची परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहे. अर्थात शंभर टक्के निकाल देणारी ही शाळा ठरली असून दरवर्षीच या शाळेचा निकाल सर्वात्कृष्ट लागत असतोय सदरहु शाळेत कु.मंगल मिसाळ ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या एक सदस्य आहेत.
दरम्यान राज्यातील दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे महिला सामाजिक कार्यकर्त्या अनुश्री दहेगांवकर, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष कु.किरण साळवी,अर्चना चावरे या शिवाय
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय समर्थ,पुंडलिक गोठे, अधिवक्ता रवींद्र उमाठे,प्रकाश रेड्डी ,अधिवक्ता हिमानी वाकुडकर, ॲड.पुनम वाघमारे, छबूताई वैरागडे, चंदा इटनकर, रजनी रणदिवे, रेखा बारसागडे, पल्लवी जुमडे, जागतिक पुरस्कार कवयित्री कु.अर्चना सुतार , श्रुति उरणकर, शैला चिमड्यालवार, वर्षा शेंडे, मुग्धा खांडे, डॉ.अंजली साळवे, आदिंनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.