आल्लापल्ली येथे घरी धाड टाकून पोलीसांनी 77 हजारांचा अवैध मुद्देमाल सह आरोपी ला अटक.
एस.के.24 तास
आलापल्ली : पोलीसांनी एका अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या घरात धाड टाकली असता त्यांच्या घरामध्ये ७७ हजारांचा अवैध मुद्देमाल मिळून आला.
आल्लापल्ली येथील,सचिन लक्ष्मण मिसाळ हे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहेरी पोलीसांनी धाड टाकली असता त्यांच्या घरामध्ये २१६ नग बिअर किंमत ५४ हजार रुपये ,२५० निपा देशी दारू किंमत २० हजार रुपये,१० बंपर काचेचे बिअर किंमत ३ हजार रुपये असा एकूण ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
आरोपी विरुद्ध कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल केला आहे.अहेरी पोलीसांनी सदर कारवाई केली असल्याने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.