आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली च्या 6 कोटी च्या भ्रष्टाचारात गडचिरोली च्या ट्रक मालकांना आष्टी पोलिसांचे अभय ?
★ मिलर्स ने लिहून दिले की ट्रक ने आमच्या कडे माल आलाच नाही.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली येथील प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार सहीत 4 आरोपींना लोकल क्राईम बॅच ने चौकशी करून त्यांचेवर 420,409 धारा 34 नुसार जेरबंद करून जेल ची हवा दाखविण्यात आली.
सदर प्रकरणात गडचिरोली येथील ट्रक मालक व्यवसायीक व राजकीय व्यक्तीना पकडण्यात आष्टी पोलिसांना यश आले नाही.तेव्हा धानाची उचल न करताच ट्रक ने उचल केली व धान मिलर्स ना पोहोचविला म्हणणारे गडचिरोली येथील ट्रक मालक यांची चौकशी आष्टी पोलीसांनी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष,मुनिश्वर बोरकर यांनी केली असुन सदर प्रकरणातील ट्रक मालकावर कारवाई करावी अन्यता रिपाई तर्फे उपोषण करण्याचा इशारा प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी दिलेला आहे.
आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली च्या पदाधिकारी यांनी आष्टी येथील धान खरेदी गोदामातून ६ करोड 2 लाखाची अफरातफर केल्याची रिपोर्ट दाखल होताच आदिवासी विकास महामंडळच्या संचालिका,बनसोड यांनी चौकशी केली असता प्रादेशिक व्यवस्थापक कोटलवार , केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्रे आष्टी,रमेश मडावी व रिझनल मॅनेजर या चारही आरोपीवर 420,409 धारा 34 अन्वये गुन्हा दाखल करून PCR नंतर MCR करण्यात येवून त्यांना जेल ची हवा दाखविण्यात आली.
आष्टी ठाणेदारानी प्रथम कोटलावर यांना क्विन चिट दिली होती.त्यातही ज्या मिलर्सना धान न पुरवठा करता टूक ने धान पुरवठा केल्याचे असतांना सुद्धा गडचिरोली येथील बल्याढ ट्रक मालक यांची चौकशी केली नाही. सरकारला 6 कोटी 2 लाखाचा चुना लावणारे 4 आरोपी पकडून ट्रक व्यवसायिक व राजकारणी यांना मोकाट सोडण्यात आले.
लोकल क्राईम ब्रॅन्च नी खोटी वाहतुक करण्याऱ्या ट्रक मालकास पकडून त्यांचेवरही गुन्हा दाखल करावा.अशी मागणी रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी केली असुन उपोषणाचा ईशारा सुद्धा दिलेला आहे.