★ पश्चिम बंगाल मध्ये कायद्याचे धिंडवडे.
एस.के.24 तास
कोलकता : पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे 32 वर्षीय भाजपा अल्पसंख्यक मोर्चाच्या महिला उपाध्यक्षांना कपडे काढून मारहाण करण्यात आली.पोलिसात तक्रार देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे भाजपाने यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पत्राद्बारे तक्रार केली आहे.मारहाण करणारे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
पीडित महिलेने शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले की, मागील काही दिवसांपासून भाजपाचा राजीनामा देऊन तृणमूल पक्षात प्रवेश करण्यासाठी धमकीचे फोन येत होते.समोरच्या व्यक्तीला नकार दिल्याने त्याने शिवीगाळ केली.तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती.त्यानंतर बुधवारी रात्री काही लोक घरी आले आणि त्यांनी मारहाण केली.
अंगावरील साडी काढली आणि केस पकडून रस्त्यावर फरफटत नेले.तसेच गटारातील पाण्यात तोंड बुडवून मारण्याचा प्रयत्न केला.मारहाण करणार्यांनी चेहरा कपड्याने झाकल्यामुळे ओळखता आले नाही.या प्रकरणी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही.
पक्षाच्या वतीने यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.पोलिस अधिकार्याने सांगितले की, हे प्रकरण राजकीय नसून कौटुंबिक वादाचे आहे. आम्ही गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून त्यांचा प्रकरणात सहभाग असल्यास अटक केली जाईल.