नागभीड येथे " राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " 299 जयंती साजरी

नागभीड येथे " राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " 299 जयंती साजरी


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक

   

नागभीड : 31 मे 2024 ला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती नागभिड  नगरात साजरी करण्यात आली. सकाळपासून विविध कार्यक्रम घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली . सायं.6 .00वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मा.रंधे साहेब ,अमरावती (डेप्युटी इंजिनियर- लघु सिंचन विभाग नागभीड) हे होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान.श्री.सिताराम बावनकर - अध्यापक जनता वी.बहुउद्देशीय संस्था नागभीड,प्रमुख मार्गदर्शक मान.श्री,गुरुदेवजी शिवणकर - सामाजिक कार्यकर्ता डोंगरगाव,माननीय श्रीमान कोल्हे सर,मान.आनंदजी गोल्लरवार, मान.पातुर्डे मॅडम - स्टॉप नर्स आरोग्य विभाग नागभिड,मान. लाडे मॅडम- स्टॉप नर्स आरोग्य विभाग नागभिड


प्रमोदजी कंकलवार - धनगर समाज अध्यक्ष,श्री - बाळूदास कोरेवार,धनगर समाज उपाध्यक्ष,मान.राजू पोत्रजवार,तानाजी पोत्रजवार ,भोलाजी भगतवार,गणेशजी पोत्रजवार,सुधाकरजी कन्नमवार इत्यादी मान्यवर  प्रमुख अतिथीच्या उपस्थित होते. सन्मा. बावनकर सर यांनी आपल्या अमोल वाणीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याची माहिती उदाहरणे देऊन पटवून दिली.श्री गुरुदेवजी शिवणकर  यांनी सामाजिक उत्थान विषयी मार्गदर्शन केले.


श्री.अशोक कोल्हे सर यांनी आपल्या स्वयंरचित कवितेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्यांच्या कार्याची महती पटवून दिली. त्यानंतर नागभिड नगरात भव्य रॅली पुण्यश्लोक अहिल्यादेवींची काढण्यात आली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन  सुधाकरजी कन्नमवार,कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान.गणेश कोरिवार  सर- डोंगरगाव बुज, तसेच या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन ज्योतीताई गोल्लरवार यांनी केले.


 " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा या कार्यक्रमाचे मुख्य कार्यकर्ता म्हणून निखिल भंडारवार व धनगर समाज मंडळ तरुण युवा कार्यकर्ते यांनी सांभाळले आणि सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रम यशस्वी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !