आष्टी येथे अवैध दारू सह 22 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त ; दोन आरोपी ताब्यात.
चामोर्शी : आष्टी येथील पोलीसांनी अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी ताब्यात घेतले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून आलापल्ली कडे जात असलेल्या आयशर ट्रक क्रं.MH 40 Y 1905 ला नाकाबंदी करून चेक केले असता सदर वाहनांमध्ये 15000 निपा देशी दारू किंमत बारा लाख रुपये व ट्रक किंमत दहा लाख रुपये असा एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ट्रक चालक राजेश फुलनसिंग यादव वय,27 वर्ष रा जीमलगट्टा ता.अहेरी व अमोल बाजीराव मैस्कर वय,35 वर्ष रा.आलापल्ली ता अहेरी यांना ताब्यात घेण्यात आले व कलम ६५,(अ),९८(२),८३ मदाका नुसार कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक,मानकर, पोलीस उपनिरीक्षक,पवार,महिला पोलिस उपनिरीक्षक वनवे,पोहवा मडावी,करमे,नापो शडमेक,पोशी डोंगरे,तोडासे,राजुरकर,मेदाळे, रायशिडाम आदिंनी केली आहे.