2024-2025 बजेट अजित पवारांनी केली " लाडकी बहीण " योजनेची घोषणा कोण ठरणार पात्र ? किती मिळणार निधी ?
★ महिलांसाठी अर्थसंकल्पात काय काय तरतूद ?
एस.के.24 तास
मुबंई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला.२०२४-२०२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प त्यांनी मांडला. मध्य प्रदेशातल्या लखपती दीदी प्रमाणेच महाराष्ट्रात लाकी बहीण योजनेची घोषणा त्यांनी केली. महिलांना केंद्र स्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरु केली.महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवणार आहो असं त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे लेक लाडकी योजना,जननी सुरक्षा योजना,पंतप्रधान मातृयोजना आपण आणल्या आहेत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा : -
महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वय वर्षे २१ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा निधी मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जुलै २०२४ म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही योजना लागू करण्यात येईल.” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
महिलांसाठी अर्थसंकल्पात काय काय तरतूद ?
मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी ८ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात येणार ही घोषणा करण्यात आली. स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो.गॅस सिलिंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.
महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे : -
राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील.महिलांना बस प्रवासात सवलत.महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत.वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील.बचत गटाच्या निधीत १५ हजारांवरुन ३० हजार निधीयावर्षी २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार.
अजित पवारांची शेरो - शायरीही चर्चेत
शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करुन देता यावी यासाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेतून ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना असे पंप उपलब्ध करून देण्याचं मी जाहीर करत आहे.
यावेळी त्यांनी मोफत या शब्दावर भर दिला. तसंच यानंतर एक शेरही त्यांना म्हटला.तुफानों में संभलना जानते है अंधेरों को बदलना जानते है.चिरागों का कोई मजहब नहीं है ये हर महफिल में जलना जानते है! असा शेर अजित पवारांनी सभागृहाला ऐकवला. हयात लेके चलो, कायनात लेके चलो चलो तो सारे जमाने को,साथ लेकर चलो.हा दुसरा शेरही काही वेळापूर्वी अजित पवारांनी सभागृहात ऐकवला.