13 वर्षांची मुलगी 6 महिन्यांची गर्भवती
एस.के.24 तास
नागपूर : कामठीतील कुख्यात गुन्हेगाराची १३ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले.तपासणीत मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. मुलीला गर्भवती झाल्याबाबत विचारणा केली असता ती काहीही सांगण्यास तयार नाही. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
जुन्या कामठीत राहणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगारांच्या १३ वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिने आजीला सांगितले. तिच्या आजीने तिला ३१ मेला एका महिला डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे प्राथमिक निदान केले.तिच्या आजीचा विश्वास बसला नाही.
विचारणा केली. कुणीही प्रियकर नाही आणि प्रेमसंबंध नसल्याचे सांगितले.त्यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिली. त्यामुळे ती आजीसोबत घरी आली.आजीचा नातीवर विश्वास असल्याने तिने घरात कुणालाही सांगितले नाही. ३ जूनला मुलीने पोट दुखत असल्याचे आईला सांगितले.
आईने जरीपटक्यातील एका डॉक्टरकडे मुलीला आणले. डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर अहवालात मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
डॉक्टरांच्या अहवालानंतर तिच्या आईने क्लिनिकमध्ये तिची कानउघडणी केली. डॉक्टरांनी मुलीचे वय लक्षात घेता पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
मुलीच्या आईने पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला : -
१३ वर्षांची मुलगी गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, मुलीच्या आईने पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. मात्र, अल्पवयी मुलीवर कुणीतरी अज्ञात आरोपीने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनीच प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नातवाईक युवकावर संशय : -
पीडित मुलगी प्रियकराचे नाव सांगण्यास तयार नाही. त्यामुळे पोलीस अडचणीत आले. मात्र, पोलिसांनी काही संशयितांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीवर कुणीतरी नातेवाईक मुलानेच बलात्कार केल्याची संशय वर्तविण्यात येत आहे.त्यामुळेच मुलगी नाव सांगण्यास तयार नाही तर मुलीची आई सुद्धा तक्रार देण्यास तयार नव्हती.हे प्रकरण जुन्या कामठी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.