भाग क्रं. - 1
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशांचा खूलेआम अवमान.
" ठोक मद्यविक्रीत " दडली आहे खरी गोम ?
रोखठोक : - महेश पानसे
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री व परवाना बाबत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले ही तशी चांगली गोष्ट,मात्र यात चिल्लर दारू/बियर विक्रेत्यांना ठोक विक्री करण्यापासून रोकण्या जोगे कुठलेही निर्देश दिसले नाहीत व हिच बाब जिल्हाधिकांऱ्यांच्या आदेशाला पायदळी तुडविण्यासाठी भक्कम ठरल्याचे चित्र संपुर्ण जिल्ह्यात बघायला मिळू लागले आहे.
जिल्ह्यातील नव्वद टक्के देशी,विदेशी,वाईन/बियर विक्री अनुज्ञप्तीवाले चिल्लर विक़ी परवाना असताना ठोक विक्री करतात व यामूळे चोर मार्गाने पहाटे 4 : 00 वा.पासूनच मद्य उपलब्ध होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या एका चांगल्या आदेशाची अवहेलना सुरू नाही का ?
आता कुणाच्या मदतीने वा कृपेने चिल्लर मद्यविक्री करणाऱ्यांना ठोक विक्रीची खुजली सुटते हे वेगळे सांगायला नको असे जाणकार बोलतात.उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधिक्षक संजय पाटील यांनी नासविलेली मद्यविक्री यंत्रणा सरळ करायची मानसिकता संबधीत विभागाची नाही हेच समजायचे का ? हा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे.
दारू विक्री संदर्भात सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन तो पावेतो होणार नाही जो पावेतो अनधिकुत ठोक विक्री करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांना सुतळीबाम्ब लावणार नाही हिच खरी कार्यवाही असल्याचे बोलले जाते.
दारूबंदी उठल्यानंतर चिल्लर मद्य विक्री करणाऱ्यांनी कोरोना काळातील आपली गरीबी दूर करण्यासाठी ठोक विक्रीचा खूलेआम धडाका लावला हे सहजलक्षात येते.आज जिल्हातील बहुतांस गावात( जिथे अनुज्ञप्ती नाही) चोवीस तास देशी,विदेशी मिळते.ही येते कुठून ? याचे उत्तर चिल्लर विक्रेते सहज देऊ शकतात. मद्यविक्रीतील बेबंदशाही,विक्रेत्यांचा बेशिस्त व्यवहार ,नियमबाह्य दारूविक्री,संबधित विभाग व पोलीसांची हप्तेखोरी,बघता जिल्हाधिकारी यांनी चिल्लर दारू विक्री परवाना धारकांच्या मुसक्या आवळल्या तर सारा दारूचा धंदा शिस्तीत येऊन दुदैवी घटना वेगाने घटणार आहेत असे जाणकार बोलतात.
जिल्ह्यात 700 बार अन्ड रेस्टारंट,15 वाईन शॉप,140 देशी दारू दुकान,150 बिअर शॉपीं आहेत.
यातील किती विक़ेते दारुची बेकायदेशीर ठोक विक्री करणार नाहीत.नियमांचे पालन करतात व करतील, बेभाव विक़ी थाबवतील,परवाना धारकांनाच मद्य देतील. हा विषय जिल्हाधिकारी कार्यालय्,उत्पादन शुल्क विभाग,पोलीस विभाग किती गंभीरतेने घेईल आता यावरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा सन्मान व अपमान अवलंबून असल्याचे जाणकार बोलतात.
यंत्रणेवर यासंबधाने विश्वास ठेवण्याजोगा जिल्हात दारू विक्री चा इतिहास सध्यातरी नाही.