भाग : - 04
" ठोक मद्यविक्री "
तंटामुक्ती समित्या बनल्या शोभेच्या वस्तू ?
रोखठोक : महेश पानसे.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : पुण्यातील पौर्षे कार दुर्घटनेने सारा महाराष्ट्र संतापला असताना,सारे संबधीत प्रशासन जनटिकेचा सामना करीत असतानाच राज्याच्या उपराजधानीत मद्यधुंद होऊन बेदरकारपणे गाडय़ा चालवून निरपराध लोकांचा बळी घेणाऱ्यांचा माज काही अजूनही उतरलेला नाही.
काल फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडण्याचा दुदैवी प्रकार घडल्याने दारूविक्री संबंधाने आचारसंहिता प्रसिद्ध करण्यात पुढाकार घेणाऱ्या संबधीत विभाग मात्र "झिरो" ठरला की काय ? हा संतप्त सवाल व्यक्त होऊ लागला आहे.
चिल्लर मद्य विक्री करणाऱ्यांकडून मद्य प्राशन परवाने न बघता बेधडक ठोक विक्री करण्यात येत असल्याने अशा दुदैवी प्रकारांची शृंखला सुरु आहे व भविष्यात सुरु राहणार आहे हेच सिद्ध होत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दररोज कुठेना कुठे मद्य प्राशन करून बेदरकारपणे गाडया चालवून क्षती पोहोचविण्याचा प्रकार चचैत असतो.चंद्रपूर जिज्हा सिमेवरील गडचिरोली जिल्हा सिमेवरून खूलेआम देशी व विदेशी दारू पोहोचविली जात आहे.ही बाब नविन नाही पण आजच्या घडीला यामूळेच गडचिरोली जिल्ह्यातील वाहन चालविलेण्याचा बेदरकारपणा वाढत असल्याची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसते.
मुल,सावली,गोंडपिपरी तालुक्यातून देशी,विदेशी चिल्लर विक्रेत्यांनी गत अनेक वर्षांपासून चालविलेली ठोक विक्री व याकडे राज्यात उत्पादन शुल्क विभागाचे व पोलीस विभागाचे "अर्थपूर्ण " दुर्लक्ष भविष्यात अनेक
मोठया दुर्घटना आमंत्रण देत असेल तर नवल नसावे असे जाणकारांचे मत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या नाहीत स्वार्थाकरिता ठोक विक्री करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील नटवरलाल यांनी गाव पातळीवरील तंटामुक्ती सम इत्यांना शोभेच्या वस्तू बनविलेण्याचे पातक आपल्या पदरी पाडले असल्याचे बोलले जाते.
ठोक विक़ीच्या नादात ग्राम सरक्षण दलाचा जन्म होऊच दिला गेला नाही जिल्हात स्थानीक गुन्हे शाखेकडून चोरटया ठोक मालाची जप्ती सुरु आहे.लाखोचा मुददेमाल पकडला जातो.वाहने पकडली जातात पण बेकायदेशीर ठोक विक्री करणाऱ्यांची नावे पुढे येत नाहीत याचे कारण जनतेला कळायला वाव दिसत नसल्याचे चित्र दुदैवी चित्र बघावयास मिळते.
जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक कडक कार्यवाहीचा दम भरतात पण ठोक विक्रीचा कळस गाठणाऱ्यांना पाठीशी घालणारे नटवरलाल कोण ? हा सवाल मात्र कायम आहे.
जिल्हाधिकारी यांनी कडक नियमांचे आदेश काढलेत पण यातील नियमांची ऐशीतैशी करण्यातच धन्यता माणणाऱ्यां मागे प्रशासनातील काही नटवरलाल आहेत अशी जिल्हावासियांची धारणा झाल्याचे स्पष्ट चित्र बघावयास मिळते आहे.
देशी, विदेशी अनुज्ञप्तीधारक मोठया संख्येने बेकायदेशीर ठोक विक़ी करतात व जो पावेतो हे सुरू आहे,ही मानसिकता कायम आहे व या चोरांना पाठीशी घालणारे प्रशासनातील नटवरलाल आहेत तो पावेतो जिल्यधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना सुरू राहणार यावर जिल्यातील जनता ठाम आहे.