CBSE बोर्डाच्या निकालात एल.एम.बी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे सुयष ; ओजस धनंजय नाकाडे ब्रम्हपूरी तालुक्यात प्रथम.

CBSE बोर्डाच्या निकालात एल.एम.बी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे सुयष ; ओजस धनंजय नाकाडे ब्रम्हपूरी तालुक्यात प्रथम.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : १४/०५/२४ नेवजाबाई हितकारणी एज्युकेशन सोसायटी गेल्या अनेक वर्षा पासुन आपल्या विविध शाखेतून शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावित अनेक शिखर गाठित आकाशाला गवसणी घालित आहे आणि ही यशाची मालिका अविरत सुरु राहिल यात काही शंका नाही. याच सोसायटी च्या एल. एम. बी. पब्लिक स्कूल या शाखेने सुद्धा ही परंपरा कायम राखुन आता पर्यंत सलग या वर्शीही CBSE 10 वी बोर्डचा उत्तम निकाल देऊन पोच पावती दिली आहे.


या वर्षी सुद्धा 2023-24 दहावी च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीच्या तूलनेत उत्तम टक्केवारीत बाजी मारुन निकालात भर पाडलेली आहे. या मध्ये ओजस धनंजय नाकाडे या विद्यार्थ्याने 95.80ः प्राप्त करुन फक्त स्कूल मध्येच नाही तर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ही आमच्या साठी गौरवाची बाब आहे. तसेच मितीक्षा राजेष पिलारे हिने 95.20ः प्राप्त करुन द्वितीय क्रमांक आणि कनक किषारे चौधरी 94.00ः प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. 


भुशण विजय बरडे या विद्यार्थ्यांने 93.80ः प्राप्त करुन चौथा आणि श्रेया ओमकार वासनिक 93.20ः प्राप्त करुन पाचवा क्रमांक पटकाविलेला आहे. तसेच ओजस धनंजय नाकाडे याने प्रथम क्रमांक पटकावुन गणित या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करुन दरवर्शाची 100 पैकी 100 गुण प्राप्त करण्याची परंपरा कायम ठेवली. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षिच्या  विद्यार्थ्यांनी टक्केवारित वाढ करित उत्तम निकाल देऊन स्कूल च्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.


या वर्षीच्याCBSC 10 विच्या सर्व विद्यार्थ्यांनी निकालात मारलेल्या उत्तम बाजीसाठी आणि त्यानी प्राप्त केलेल्या घव-घवित यशाबद्ल एन. एच. एजुकेशन सोसाइटी चे सचिव माननीय  अशोकजी भैया,एल.एम.बी.पब्लिक स्कूल च्या डायरेक्टर अषिता भैया,प्राचार्य कादिर कुरेशी तसेच उपप्राचार्य रष्मी राठी,पर्यवेक्षिका रष्मी झोडे  तसेच स्कूल चे सर्व शिक्षकवृंद  व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वानी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदंन करुन कौतुक केले आणि त्याना त्यांच्या पुढील वाट चालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !