महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) शाळेने १००% निकाल लावून रचला इतिहास.

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) शाळेने १००% निकाल लावून रचला इतिहास.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,२८/०५/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव भोसले द्वारा संचालित महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले या शाळेने मार्च 2024 नागपूर बोर्ड एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लावून दैदिप्यमान कामगिरी करून इतिहास रचला.


कोरोना काळातील परीक्षेचा निकाल वगळता आजपर्यंत च्या काळात शाळेचा शंभर टक्के निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ असावी.


शाळेचा शंभर टक्के निकाल लागण्याचे खरे श्रेय शाळेतील शिक्षक,सचिन नरहरी क-हाडे मुख्याध्यापक ओम प्रकाश बगमारे आणि इतर विषय शिक्षक यांनी सांगितलेल्या मार्गदर्शना च्या रस्त्याने विद्यार्थी पावलोपावली चालत जाऊन तंतोतंत मार्गदर्शनाचे तत्व पाडले आणि त्यामुळेच विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सांगितले.


विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असता गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी यांचा विद्यालयाच्या वतीने अभिनंदन सोहळा पार पडला याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ओम प्रकाश बगमारे यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी पिंपळगावचे सरपंच सन्माननीय सुरेश दुनेदार व  श्री हेमराज कांबळे माजी उपसरपंच, श्री दादाजी कांबळे नीलकंठ देशमुख पालक, सेवा जेष्ठ शिक्षक श्री मस्के सर पुरी सर कुमारी यांचं राऊत शिक्षिका यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


वर्ग दहावीच्या ७५ विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये ३५ विद्यार्थी द्वितीय तर पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


विद्यालयातून कुमारी सानिया हेमराज कांबळी हिने ८६.६०% गुण प्राप्त करून विद्यालयातून पहिली येण्याचा मान प्राप्त केला तर निलेश अतुल धोटे ८४.२०% गुण प्राप्त करून द्वितीय आणि कुमारी उज्वला नीलकंठ देशमुख ८३.६०%  गुण प्राप्त करून तृतीय गुनानुक्रमे तृतीय येण्याचा बहुमान प्राप्त केला.

 

शाळेने उत्कृष्ट निकाल शंभर टक्के लावल्यामुळे संस्था अध्यक्षा श्रीमती विमलताई  नरहरी क-हाडे आणि डॉ. प्राध्या. रुपेश नरहरी क-हाडे दिग्रस यांनी मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी आणि त्यांना घडविणारे पालक यांचे अभिनंदन केले.


गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री पुरी सर यांनी मानले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शाळेने शंभर टक्के निकाल लावल्यामुळे शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !