जिवन खोब्रागडे यांच्या लेखनीतून...
★ व्हेंटिलेटर ★
एस.के.24 तास
महागाईचा वनवा
सारी कडे पेटला रे
पोटातल्या आतड्यांचा
नेत्यांनी केला खिमा रे..!
लोकांचे प्रश्न हिताचे
ओठ शिवे बोलणारे
यंत्रणेचा मार केला
नियंत्रण सुटले रे..!
संवाद साधत होत्या
एकमेकांशी खुर्च्या रे
तरी बसतोय राजा
नेमकाच आपला रे..!
राजमुखीच्या तोफेने
लोकांची उडी झोप रे
जुमल्यावरी जुमले
किती फेकले बाप रे..!
खोटे ही पचून जाते
डकार घेत नाही रे
परिश्रमाचे सत्य ही
पचता पचे ना रे..!
जनमुखाची तोफही
चाले राजा वरती रे
बोंबला कितीही तुम्ही
काळ वाट शोधतो रे..!
सत्य असतेच कटु
हे पचत नसते रे
निरंतर खोटे खोटे
खरे वाटू लागले रे..!
व्हेंटिलेटर वर ही
जनता श्वास घेते रे
लोकशाही न्यायालया
जुमानत नाही रे..!
कवी : - जीवन खोब्रागडे - टेक्नो रेसिडेन्सी,नागपूर