पाईप लाईनचे पाणी वाहतो रस्त्यावर चार महिन्या पासून चकपीरंजी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.
एस.के.24 तास
सावली : चकपिरंजी वार्ड क्रमांक.1 रोशन धनराज तिवाडे यांच्या घरासमोर मागील चार महिन्या पासून पाईपलाईन फुटलेली आहे.ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे.रोशन तिवाडे यांचं घराचं काम चालू असल्याने विटा भरलेली ट्रॅक्टर आणने कठीण आहे.
त्यामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे चार महिने होऊन सुद्धा याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.रोशन तिवाडे यांच्या घराजवळ ग्रामपंचायत सदस्य मा. मेहमुदा शेख हे राहतात परंतु ही समस्या मासिक सभेमध्ये मांडलेली नाही.ग्रामपंचायत मासिक सभेत लोकप्रतिनिधी कशा साठी असतात असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो.
दोन दिवसांमध्ये या समस्येची विल्हेवाट लागली नाही तर ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक युवा कार्यकर्ते,प्रफुल निरुडवार यांनी दिलेला आहे.