आकसापुर येथे समता सैनिक दल शाखेचे उद्घाटन.

आकसापुर येथे समता सैनिक दल शाखेचे उद्घाटन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी  : दिनांक,24/05/2024 जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील आक्सपुर येथे समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक प्रशांत डांगे हे होते.तर उद्घाटक म्हणून विहार मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे डेव्हिड शेंडे चंद्रभान राऊत प्रफुल्ल ढोक, प्रफुल्ल रामटेके हे उपस्थित होते.

सर्वप्रथम नव्याने स्थापित समता सैनिक दल यांनी गावातील मुख्य रस्त्यांनी मार्च काढले त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून समता सैनिक दलाचे प्रतिज्ञा आणि नियम समता सैनिक दलातील सैनिकांना ग्रहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.


समाजातील बांधवांचे रक्षण करण्यासाठी आणि तथागत बुद्धांच्या बौध्द धम्माचा तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने समता सैनिक दलात सहभाग घेणे आजच्या परिस्थितीत गरजेचे आहे असे उपस्थित मान्यवरांनी विचार प्रकट केले.


समता सैनिक दलाच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमास परिसरातील अनेक समता सैनिक दलाच्या सैनिकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमानंतर भोजन दानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी गावातील बौध्द उपासक उपासिकानी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन आप्पा चहांदे यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम लिंगायत यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !