तहसील कार्यालय,मुलचेरा येथील पुरवठा निरीक्षक,राहूल डोंगरे सापडले ए.सी.बी.च्या जाळ्यात यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक.

तहसील कार्यालय,मुलचेरा येथील पुरवठा निरीक्षक,राहूल डोंगरे सापडले ए.सी.बी.च्या जाळ्यात यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक.


एस.के.24 तास


मुलचेरा : तहसिल कार्यालय मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील पुरवठा निरीक्षक राहूल भाउजी डोंगरे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.राहुल भाऊजी डोंगरे वय,40 वर्ष  वर्षे रा.आष्टी हे मुलचेरा तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.त्यानी आपल्या पदाचा फायदा घेण्यासाठी राशन कार्ड धारकांना नेहमीच सतावून लाचेची मागणी करीत होते व महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 500 रुपये खर्च येतो ते तुम्ही द्या नाहीतर तुमचे काम होणार नाही असे सांगून हात झटकून टाकीत होते.


त्यामुळे त्रस्त झालेल्या वर्षा गुरुदास गेडाम यांनी ए.सी.बी.च्या अधिकारी यांना माहिती दिली त्या वरून प्रत्यक्ष शाहनिशा करुन मुलचेरा तहसील कार्यालयात सापळा रचला असता राहुल भाऊजी डोंगरे 500 रुपये लाच घेताना साक्षीदार यांच्या समक्ष मिळूण आले 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,यातील तक्रारदार हे मु. मुखडी टोला पो.गोविंदपुर ता.मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराची आई नामे जिवनकला गेडाम हिचे नावे असलेला शिधापत्रिका मध्ये वडील,मजवा भाऊ,वहीणी व भावाची मुलगी यांची नावे होती.तक्रारदार यांचे मजवा भाऊ गुरुदास यांच्या कुंटूबाचे नविन शिधापत्रिका वहीनी नामे वर्षा गुरुदास गेडाम यांचे नावे दि. ३०/०१/२०२४ रोजी तयार करण्यात आले.


परंतू स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडे थम मशीनवर नाव न आल्याने शासनाच्या योजनेचे राशन मिळत नसल्याचे वहीनी वर्षा यांनी सांगीतले. 


तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे यांना माहिती दिली तेव्हा महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता 500 /-रू. लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली कॅम्प मुलचेरा येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली.


पोलीस उपअधीक्षक, श्रीमती अनामिका मिर्झापुरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळ कारवाईचे आयोजन केले असता,त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदाराचे वहीणी चे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने,महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता आरोपी,राहूल भाऊजी डोंगरे,पद - पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय मुलचेरा,ता.मुलचेरा, जि. गडचिरोली यांनी 500 /- रूपयाची पंच साक्षीदार समक्ष सुस्पष्ट मागणी करून 500 /- रू.लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे.मुलचेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी डोंगरे यांचे आष्टी येथील निवासस्थानाची ॲन्टी करप्शन ब्युरो,गडचिरोली चमू कडुन झडती घेण्यात आली.


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक,श्री,राहुल माकणीकर,ॲन्टी करप्शन ब्युरो,नागपूर,सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधीक्षक श्रीमती,अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो.नि.श्रीधर भोसले,पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जोंजारकर,पोष्टि संदिप उडाण, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !