कढोली येथे आदिवासी सल्ला गांगरा शक्ती प्रतिष्ठापना तथा समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न.

कढोली येथे आदिवासी सल्ला गांगरा शक्ती प्रतिष्ठापना तथा समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील कढोली येथे जागतिक आदिवासी गोंड सगा मांदि शाखा कढोली तालुका सावली जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आदिवासीची दैवत मानल्या जाणाऱ्या मातृ पितृ शक्ती म्हणजे सल्ला गांगरा शक्ती प्रतिष्ठापना तथा समाज प्रबोधन कार्यक्रम येथे संपन्न झाले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज आत्राम प्रदेशाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी ,उद्घाटक किशोर कारडे सरपंच ग्रामपंचायत कढोली ,प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम ,पांडुरंग जुमनाके गोंडी पुणेम प्रचारक चांदागड, हरिहर शेडमाके जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय भूमक संघ, उपसरपंच सुमनबाई गेडाम, धनराज शेडमाके संचालक आश्रम शाळा कढोली ,सरपंच उस्टुजी पेंदोर, मनोज कारडे, संजय मेश्राम ,, दिलीप मडावी,आदिवासी गोंड समाज प्रचारक चांदागड यांची चंमू प्रामुख्याने उपस्थिती होती.


सकाळी गावामध्ये माता पूजन करण्यात आले त्यानंतर गोंडी देव देवतांचे पूजन, सल्ला गांगरा महागोंगो पूजन, त्याच्यानंतर सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले व दुपारी दोन वाजता समाज प्रबोधन कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.


 यात समाज प्रबोधन करताना प्रमुख मार्गदर्शकांनी आदिवासी समाज शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक दृष्टिकोनातून कसे विकसित होईल आदिवासी सांस्कृती,यावर प्रकाश टाकण्यात आले या कार्यक्रमानिमित्त रात्रोला गोंडी नृत्य रेला चा कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमासाठी समाज अध्यक्ष प्रकाश कुळमेथे, 


उपाध्यक्ष प्रमोद कन्नाके,सचिव नितेश पेंदाम ,सहसचिव अमित गेडाम व सर्व आदिवासी समाज बांधवांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाला यशस्वी केले कार्यक्रमाला शेकडो आदिवासी महिला, बांधवांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेडमके यांनी तर आभार प्रदर्शन भांडेकर सर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !