पुल्लीगुडम गावाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टंचाई.
★ समाजसेवक तथा लोकसेवक व माजी ग्रा.पं.सदस्य,रामचंद्र कुमरी यांनी समस्यावर भेट.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
सिरोंचा : पुल्लीगुडम येथील गावातील १०० % टक्के आदिवासी समाज आहेत स्वतंत्र होउन ७७, वर्षे पूर्ण झाली आहे पण यागावातील शौचालय बांधकाम नाही, म्हैशी पालन गट नाही, कुक्कुटपालन गट नाही, बकरी पालन गट नाही, वैयक्तिक पातळीवर गुरांच्या गोट्या बांधकाम नाही, अशे आनेक समस्येवर चार्च करण्यासाठी. लोकसेवक. व समाजसेवक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य, रामचंद्र कुमरी, यांनी पुल्लीगुडम गावाला भेट देऊन पुल्लीगुडम गावाच्या समस्या जनुन घेतले आहे.
सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची टंचाई, पुल्लीगुडम गावात घराअसलेले जागांची पट्टे देण्यात यावे, वनहक्क जमीनीची पट्टे देण्यात यावे, शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन बोअरवेल देण्यात यावे. पुल्लीगुडम शेतकऱ्यांना शेती पऱ्यांत रस्ता बांधकाम करण्यात यावे. झिंगानूर ते पुल्लीगुडम सिध्दा रस्ता बांधकाम वनविभागाचे मार्फत करण्यात यावे, एसटीबस सुरु करण्यासाठी मार्गा सिरोंचा. ते. कोर्ला पऱ्यांत सुरु करण्यासाठी मागणी केली आहे.
वारंवार विधुत खंडित होत असते विधुत कर्मचारी वेळोवेळी विधुत पुरवठा करात नाही, दर दोन दिवस आरोग्य सेविकांना पुल्लीगुडम येऊन तपासणी करण्यात यावे. असे पुल्लीगुडम गावातील लोकांना रोजगार हमी योजना राबविण्यात यावे, यावेळी लोकसेवक तथा समाजसेवक,माजी ग्रामपंचायत सदस्य, रामचंद्र कुमरी, यांनी गावातील लोकांची भेटून पुल्लीगुडम गावातील समस्यांचे चार्च करून, गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी साहेब पऱ्यांत पोहोचविण्यासाठी भेट घेतले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी समस्या सोडवितील जिल्हा माननीय अधिकारी साहेब, जिल्हा परिषद गडचिरोली. माननीय मुख्यकार्यापालन अधिकारी साहेब जिल्हा परिषद गडचिरोली मा.उपविभागीय अधिकारी साहेब अहेरी, सिरोंचा माननीय तहसीलदार साहेब सिरोंचा,सिरोंचा पंचायत समिती माननीय बि.डी.ओ साहेब.सिरोंचा या पुल्लीगुडम गावातील समस्या लोकसेवक समाजसेवक रामचंद्र कुमरी
यांच्या मार्फतने समस्या शासना पर्यंत पोहचविण्यासाठी सोडवितील लोकांची नावे,मुख्य पुजारी श्री.वंगा कुडमेथे, हनमंतु मडावी, निलय्या वेलादी, भिमराव वेलादी, दामोदर मडावी, प्रकार वेलादी, मदनय्या तोर्रेम, रमेश कुडमेथे, विजय मडावी, विराय्या मडावी, बंन्डे कुडमेथे, चंद्रकाला मडावी.
समक्का वेलादी, शारदा कुडमेथे, सविता मडावी,कमला मडावी, सुनिता मिच्चा, मधुरी मिच्चा, जया मडावी, या पुल्लीगुडम गावातील लोक गावातील समस्येवर वैयक्तिक योजना विषयावर चर्चा पुर्णपणे आनलाईन अर्ज दाखल कराने आवश्यकता आहे. आणि कुमरी सोबत विकास शासकीय योजनेसाठी जोरदार चर्चा करण्यात आली आहे.