माजी आमदार प्रा.अतुल देशकर याचे वतीने भानाकर यांना आर्थिक मदत.

माजी आमदार प्रा.अतुल देशकर याचे वतीने भानाकर यांना आर्थिक मदत.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक

 

ब्रम्हपुरी : दिनांक,१४/०५/२४ दिनांक ७ मे २४ रोजी उदापूर येथील महानंदा भानारकर या विधवा महिलेचे पूर्ण कुटुंब चौगान येथे लग्न कार्य साठी गेले असता दुपारी १२ चे दरम्यान त्यांचे घराला आग लागल्याची माहिती उदापूर येथील नागरिकांनी दिली.तेव्हा भानारकर कुटुंब परत आले तो पर्यंत गावकरी बांधवांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आली.


 परंतु सर्व जीवनास उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.यामुळे महानंदा भानारकर फार मोठे नुकसान झाले असून पूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे .अशी माहिती कळताच ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आम.प्रा.अतुल देशकर यांनी घटनास्थळी भेट देवुन त्यांना रु.5000 सहायता निधी मदत दिली तसेच उपयोगी साहित्य व गरजेचे वस्तूम्हणून मदत दिली.


 तसेच शासनाच्या वतीने अन्न धान्य देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री साह्ययता निधी मधुन मदत करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी प्रेमलालजी धोटे,प्रा.चंद्रकांत विटाळकर, प्रा. संजय लांबे,डॉ.प्रा.अशोक सलोटकर,उदापुर येथील सुभाष नाकतोडे, अनिल नाकतोडे, पवन बेदरे, तुळशीदास राऊत, मनोहर नाकतोडे,गोकुळ नागदेवते आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !