मला खर्रा का दिला नाही,म्हणून बाप लेक मिळून एका तरुणाला चाकू भोसकून केले ठार.
एस.के.24 तास
नागपूर : मला खर्रा का दिला नाही या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाचा पिता - पुत्राने चाकुने भोकसुन खुन केल्याचे उघडकीस आले आहे.हत्येची ही घटना वाठोडा येथील संघर्ष नगर झोपडपट्टीत मंगळवारी सायंकाळी घडली.देवी नगर गल्लीत राहणारा ३५ वर्षीय जितेंद्र गुर्जर असे मृतकाचे नाव आहे.
आरोपींमध्ये ६० वर्षीय आनंदराव बावनकर आणि त्यांचा मुलगा दिनेश बावनकर वय,26 वर्ष यांचा समावेश आहे.या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.
मंगळवारी सायंकाळी आरोपी आनंदराव हा खर्रा घेण्यासाठी घराजवळील पान टपरी येथे गेला होता.त्यावेळी मृतक जितेंद्र ही तेथे पोहोचला होता.दोघेही दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे.या वेळी जितेंद्रने पान टपरीवरुन खर्रा विकत घेतला होता.त्यावेळी आनंदराव यांनी जितेंद्रला खर्रा खायला मागितला मात्र जितेंद्रने खर्रा देण्यास नकार दिला.
यावरुन दोघांमध्ये भांडण झाले.या भांडणात जितेंद्रने आनंदराव यांना मारहाण केली.मात्र या घटनेनंतर आनंदराव यांनी घरी जाऊन हा घडलेला प्रकार त्यांचा मुलगा दिनेश याला सांगितला.यानंतर दिनेश त्याचे वडील आनंदराव यांच्यासह जितेंद्रच्या शोधात बाहेर पडले.घरापासून काही अंतरावर त्यांनी जितेंद्रला मद्यधुंद अवस्थेत पाहिलं.दिनेश याने जितेंद्रला आपल्या वडिलांना का मारलं ? याचा जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला.
वाद विकोपाला गेला आणि आरोपी पिता - पुत्राने जितेंद्रवर चाकूने हल्ला करुन जितेंद्रला जखमी केले आणि तेथून पळ काढला.