वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पोलीस हवालदार च्या उच्चशिक्षित मुलीला घरात शिरून पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे. ★ अशाने पोलीस विभागावर जनतेचा विश्वास राहील का प्रश्न निर्माण होत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पोलीस हवालदार च्या उच्चशिक्षित मुलीला घरात शिरून पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे.


★ अशाने पोलीस विभागावर जनतेचा विश्वास राहील का प्रश्न निर्माण होत आहे.


एस.के.24 तास


नागपूर : एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पोलीस हवालदाराच्या उच्चशिक्षित मुलीला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून जाळ्यात ओढले.तिच्या घरात शिरून पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे केले. तिला न्यूड फोटो पाठविण्याची धमकी दिली.या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. 


धनंजय सायरे वय,56 वर्ष  रा.धामनगाव, अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.


पीडित २२ वर्षीय तरुणी अपर्णाचे (बदललेले नाव) वडील सुद्धा पोलीस खात्यात आहेततिच्या वडिलाची धनंजय शी मैत्री होती.त्यामुळे धनंजयचे नेहमी घरी येणे - जाणे होते. सध्या तो अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात ठाणेदार आहे.अपर्णालाही पोलीस अधिकारी व्हायचे आहे. धनंजयने तिच्याशी मैत्री केली. त्याने तिला आयफोन भेट दिला तसेच तिला आर्थिक मदत केली.


 गेल्या काही दिवसांपासून धनंजय अपर्णाला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मॅसेज पाठवायला लागला. ‘तू मला न्यूड फोटो पाठव…’ असा संदेश त्याने पाठवला. त्यामुळे अपर्णाला धक्का बसला. तिने फोटो पाठविण्यास नकार दिला.त्यामुळे चिडलेला धनंजय शनिवारी सायंकाळी नागपुरात आला व थेट अर्पणाच्या घरी गेला. तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर बळजबरी करायला लागला. तिने नकार देताच तिच्यावर पिस्तूल रोखली आणि लैंगिक छळ केला. 


त्याने भेट दिलेला आयफोनही हिसकावून घेतला. नंतर तिला मारहाण केली. अपर्णाने थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सायरे याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.


दुसऱ्याच युवकावर जडले प्रेम : - 

ठाणेदार धनंजय सायरे आणि पीडित तरुणीचे प्रेमसंबंध होते. सायरे हा विवाहित असल्याने तो लग्न करणार नाही, याची कल्पना तिला होती.गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या आयुष्यात एका तरुणाने प्रवेश केला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.त्यांना लग्न करायचे होते. ही बाब तिने धनंजयला सांगितली.


 धनंजय हा तिला धमकी देऊन त्या युवकाशी न बोलण्याची तंबी देत होता. अपर्णाच्या प्रियकरामुळे हा सर्व प्रकार घडला. तिसरी व्यक्ती या दोघांमध्ये आली नसती तर त्यांचे बिनसले नसते, अशी माहिती नंदनवन पोलिसांनी दिली. पोलीस खात्याची बदनामी होऊ नये म्हणून नंदनवनचे ठाणेदार आणि अन्य अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !