वेश्या व्यवसाय जोरात ; पिंपळे सौदागर येथील अँपल ब्युटी सल्यून अँड स्पा मालक मॅनेजर कोमात गुन्हा दाखल.
★ दोन महिलांची सुटका,सुरू होता वेश्या व्यवसाय.
एस.के.24 तास
मुबंई : पिंपरी- चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. उच्चभ्रू असलेल्या पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात स्पा सेंटर सुरू होते. वेश्याव्यवसाच्या जाळ्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
अक्षय धनराज पाटील (स्पा मॅनेजर),रोहन समुद्र (स्पा मालक) आणि भूषण पाटील (स्पा मालक) यांचा वाकड पोलीस शोध घेत आहेत.या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३७० (३),३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक,देवेंद्र चव्हाण यांना मिळाली.पोलिसांनी पिंपळे सौदागर येथील अँपल ब्युटी सल्यून अँड स्पा सेंटर येथे जाऊन खरच त्या ठिकाणी स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतो का ? याची खात्री केली.
मग,तिथं एक पथक पाठवलं आणि छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दोन महिलांची सुटका यातून केली.यात महाराष्ट्रीयन आणि आसाम येथील महिलांचा समावेश आहे.स्पा मालक आणि मॅनेजर यांचा शोध सुरू असून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.