नवरगाव ( पोर्ला ) रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी. लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी.

नवरगाव ( पोर्ला ) रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी. लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. 


एस.के.24 तास


गडचिरोली- गडचिरोली वरून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेले नवरगांव पोर्ला येथे रात्रौ चे सुमारास गडचिरोली जिल्हयात फिरत असलेले जंगली हत्ती नवरगाव शेत शिवारात आले


 व कास्तकारांच्या उभ्या पिकाचे लाखोचे नुकसान केले. दि.२ मे चे रात्रौ जंगली हत्तीचा कळप नवरगाव जंगलातून दशरथ धाकडे व भगवंत चुधरी यांच्या शेतात घुसुन उन्हाळी धान पिकाचे नुकसान केले एवढेच नव्हे सदर शेतकऱ्याचे मोटार पॅम्प व पाईप लाईन ची तोडफोड केल्यामुळे सदर शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले.


 शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई शासनाने त्वरीत घ्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे यांनी केलेली आहे. पत्ता शिझन चा हंगाम व कास्तकारांचे उन्हाळी पिक आहे. आता शेतात व जंगलात कसे जायंचे या विवेचनात नवरगांव गावकरी आहेत. वन विभाग पोर्ला चे RFO मडावी अजुनही आपल्या ताफ्यासहीत पाहणी करण्याकरीता पोहचले नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !