बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणा मधील वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला.

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणा मधील वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला.


एस.के.24 तास


बल्लारपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक ५७१ मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली. मृत मादी बछडा अंदाजे एक वर्षाचा असून त्याचा मृत्यू मोठ्या वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे.


कळमणा वन विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना वनखंड क्रमांक ५७१ मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे घटनास्थळी दाखल झाले. 


वाघाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे पाठवण्यात आला.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन पोडचलवार व डॉ.आनंद नेवारे यांनी शवविच्छेदन केले. पाकिटबंद नमुने पुढील रासायनिक विश्लेषणाकरिता वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !