वादळाच्या तळाक्यामुळे माडेमुल गावातील घराचे पत्रे कवेलु उडले,जिवित हानी नाही ; नुकसान भरपाईची मागणी.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : तालुक्यातील माडेमुल ह्या आदिवासी दुर्गम भागातील गावात सायंकाळच्या वादळ वाऱ्यामुळे घरावरील टिनाचे पत्रे व कवेलु उडाले.
यात जिवितहानी झाली नसली तरीही घर मालकाचे अथोनाथ नुकसान झाले. तलाटी साजा यांनी घराची चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्याने केली आहे.
दि.२१ मे ला सांयकाळी ८.30 चे दरम्यान वातावरणात बदल होवून वादळ वारा सुटला व माडेमुल गावातील संदिप रामा उसेंडी यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले तर काहीच्या घरावरील कवेलु उडाले यात जिवित हानी झालेली नसली तरी घर मालकांचे अथोनाथ नुकसान झाले. तलाट्यांनी चौकशी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.