अशोक पवारांच्या " गावखोरी " कादंबरीचे पद्मश्री डॉ.परशुराम खुणेंच्या हस्ते लोकार्पण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२८/०५/२४ ज्येष्ठ लेखक 'बिराड'कार अशोक पवारांची नवी कादंबरी " गावखोरी " चे लोकार्पण पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,कवी डॉ.धनराज खानोरकरांच्या हस्ते ब्रह्मपुरीला नुकतेच करण्यात आले.
यावेळी लेखक अशोक पवार,डॉ.पद्माकर वानखडे,प्रा माधव चुटे व इतर वाचक मित्रमंडळी उपस्थित होते.
" गावखोरी " ही कादंबरी मुंबईच्या लोकवाड:मय गृहाने प्रकाशित केली असून मिलिंद कडणेंचे बोलके मुखपृष्ठ लाभले आहे.सदर कादंबरीत सुशिक्षित तरुण नायकाच्या संघर्षाच्या प्रवासाबरोबर बेलदार समाजाच्या व्यथा वेदनांचे चित्रण आहे.
ही कादंबरी अतिशय वाचकप्रिय असून वाचकांना अस्वस्थ करणारी आहे,असे पद्मश्री डॉ.खुणे म्हणाले तर लेखकाने अलक्षित विषयाला स्पर्श करुन त्याला न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे,असे उद् गार कवी डॉ धनराज खानोरकरांनी यावेळी काढले.