प्राची गेडाम तालुक्यातून प्रथम विश्वशांती विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल.
एस.के.24 तास
सावली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यात सावली तालुक्याचा एकूण निकाल ९४.५१ टक्के लागला असून भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय सावलीच्या वर्ग १० वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यालयाचा एकूण निकाल ७९.७२टक्के लागला असून त्यात प्राची गुलाब गेडाम हिने ९२.२० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
इंग्रजी माध्यम
प्रथम क्रमांक:कू. प्राची गुलाब गेडाम गुण;४६१ (९२.२० टक्के)
द्वितीय क्रमांक:सुजित सुरेश मुसद्दीवार:४१८(८३.००टक्के)
तृतीय क्रमांक:कु.हिना दिलीप पुप्पलवार ४०६ (८१.२० टक्के)
मराठी माध्यम
प्रथम क्रमांक : प्रदीप ओमदेव आभारे ३७४ (७४.८०टक्के)
द्वितीय क्रमांक : विनायक जयप्रकाश सोनुले ३५० (७०.००टक्के)
तृतीय क्रमांक : वैष्णवी टेकराम निकोडे ३३२(६६.४०टक्के)
गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे पदाधिकारी तथा सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.