स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावली तालुक्यातील मोखाळा येथे कारवाई करून नऊ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
★ विक्की गोडसेलवार यास अटक ; नरसिंग ऊर्फ नरसिंग अन्ना गणवेनवार फरार.
एस.के.24 तास
सावली : मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध व्यावसायिकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावली तालुक्यातील मोखाळा येथे कारवाई करून विक्की सुरेश गोडसेलवार वय,27 वर्ष याच्या कडून एक लाख 27 हजार 360 रुपयांच्या देशी - विदेशी दारूसह चारचाकी वाहन जप्त केले.
तपासा दरम्यान त्याने तो दारूसाठा नरसिंग ऊर्फ नरसिंग अन्ना गणवेनवार याचा असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या वरही गुन्हा दाखल केला आहे.
नरसिंग गणवेनवार फरार असून,पोलिस तपास करीत आहे.नरसिंग गणवेनवार हा मुल व सावली तालुक्यातील व्याहाड येथील मोठा दारूविक्रेता असल्याची माहिती आहे.दारूची वाहतूक करण्यासाठी एका वाहनात दारूसाठा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
5 मे रोजी या पथकाने विक्की गोडसेलवार याच्या घरा समोरील वाहनाची MH.BF.एफ 3771 तपासणी केली असता वाहनात 1500 नग देशी दारू,रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू,100 नगर रॉयल स्टॅग,24 नग रॉयल कंपनीची विदेशी दारू, 24 नग आयकॉनिक,48 नग बिअर असा एकूण एक लाख 25 हजार 360 रुपयांची दारू व वाहन असा एकूण नऊ लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विक्की गोडसेलवार यास अटक केली.
नरसिंग ऊर्फ नरसिंग अन्ना गणवेनवार फरार आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधीक्षक,रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक,महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात एपीआय,हर्षल एकरे,चुनारकर,पुठ्ठावार,अवथरे,चेतन गज्जलवार,आदींनी केली.